Slider Image

गावाविषयी माहिती

नारायणगाव (खेरवाडी)  हे महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील एक प्रगतशील व ऐतिहासिक गाव आहे. २०११ च्या जनगणनेनुसार या गावाची लोकसंख्या सुमारे ५१५१ आहे. गावामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा १ व माध्यमिक शाळा १, अंगणवाडी केंद्रे ५, प्राथमिक उपकेंद्र १ अशी शैक्षणिक व शारीरिक सुविधा उपलब्ध आहेत. तसेच ५ मंदिरे, सामुदायिक सभागृह, पाणीसाठवण, सार्वजनिक विहिरी व शेततळे अशा धार्मिक व सामाजिक सुविधा देखील आहेत.

गावातील बहुतांश लोकांचा मुख्य व्यवसाय शेती असून ऊस, द्राक्ष, कांदा व मका ही प्रमुख पिके घेतली जातात. द्राक्ष व ऊस या पिकांच्या लागवडीमुळे गावातील शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळते.

नारायणगाव (खेरवाडी) ग्रामपंचायतीत विविध शासकीय योजना प्रभावीपणे राबविल्या गेल्या आहेत. घरकुल योजना अंतर्गत शेकडो घरांना लाभ मिळाला आहे. स्वच्छ भारत अभियान अंतर्गत नारायणगाव (खेरवाडी) गावाने संपूर्ण खुले शौचमुक्त (ODF) दर्जा मिळवला आहे. जलसंधारण व पाणीपुरवठा योजना अंतर्गत गावात पाणीपुरवठा नियमित करण्यात आला आहे. 

ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच व १३ सदस्य मिळून गावाचा सर्वांगीण विकास घडवून आणतात. ग्रामपंचायतीचे निर्णय लोकसहभागातून घेतले जातात.
तसेच नारायणगाव (खेरवाडी) गावामधून रेल्वे जात असल्याकारणाने खेरवाडी रेल्वे स्टेशनहि आहे.
नारायणगाव (खेरवाडी) गाव आज निफाड तालुक्यातील एक आदर्श व सर्वांगीण विकासाकडे वाटचाल करणारे गाव म्हणून ओळखले जाते.

भौगोलिक स्थान

नारायणगाव (खेरवाडी)  हे गाव निफाड तालुक्याच्या ठिकाणापासून सुमारे २० कि.मी. अंतरावर वसलेले आहे. गावाचे एकूण क्षेत्रफळ ९५४.०५ हेक्टर असून ग्रामपंचायतीमध्ये ५ वार्ड आहेत. एकूण १०१० कुटुंबे येथे वास्तव्यास असून, लोकसंख्या ५१५१ आहे. त्यामध्ये २८१५ पुरुष व २३३६ महिला यांचा समावेश होतो.

गावाचा भौगोलिक विस्तार प्रामुख्याने सपाट प्रदेशात असून शेतीयोग्य जमीन मोठ्या प्रमाणात आहे. येथे हवामान उष्णकटिबंधीय आहे; उन्हाळ्यात तापमान साधारणतः ३८ ते ४०डिग्री से. पर्यंत जाते, तर हिवाळ्यात  ९ ते १०°से. पर्यंत खाली येते. पावसाळ्यात सरासरी ६० ते ७० से.मी. पर्जन्यवृष्टी होते.
नारायणगाव (खेरवाडी) गाव द्राक्ष, ऊस, टमाटे, फ्लावर, गहू, कांदे, भाजीपाला उत्पादनासाठी प्रसिद्ध असून परिसरात पाणलोट क्षेत्राचा ऐरीकेशन पाटाच्या पाण्याचा क्षेत्राचा विकास झाल्यामुळे जलसंधारणाची चांगली सोय आहे.

लोकजीवन

नारायणगाव (खेरवाडी) गावाचे लोकजीवन अतिशय साधे, श्रमप्रधान व पारंपरिक आहे. शेती हा गावचा  मुख्य व्यवसाय  असून शेतीवर बहुतांशी ७०% लोक अवलंबून आहेत उर्वरित नोकरी, धंदे, मजुरीवर अवलंबून आहेत. शेतीमध्ये मुख्यतः द्राक्ष, ऊस, गहू, कांदा, मका, टमाटे, फ्लावर व इतर भाजीपाला पिके घेतली जातात. शेतीसह काही लोक दुग्धव्यवसाय, कुक्कुटपालन व लघु उद्योग व्यवसाय यामध्ये कार्यरत आहेत.

नारायणगाव (खेरवाडी) गावात वार्षिक अखंड हरीनाम साप्ताह श्रावण महिन्यामध्ये आयोजित केला जातो. त्यात पारंपारिक व ग्रामीण संस्कृती सोबतच आधुनिकतेची झलकही दिसते. त्यामुळे गावात सर्व धर्म लोक अखंड सप्ताहाचा आनंद घेतात. त्यामुळे गावाची एकत्मिता जोपासली जाते. गावात सर्व धर्माचे लोक असून सर्व धर्म समभाव स्वरूपाचे गावात दर्शन होते.

नारायणगाव (खेरवाडी) गावामध्ये रेल्वे महामार्ग मुंबई- भुसावळ सेन्ट्रल लोहमार्ग केलेला असल्याने गावातील तरुण, शेतकरी ग्रामस्थ यांना प्रवासाची व रोजगाराची चांगली सुविधा उपलब्ध आहे. गावातील लोक मेहनती, मदतशील व अतिथी देवोभव या विचाराने वावरणारे आहेत. स्त्रियांचा सहभाग ग्रामविकास व स्वयंसाहाय्य गटांद्वारे मोठ्या प्रमाणात दिसून येतो. तरुण वर्ग शिक्षण, खेळ आणि रोजगाराच्या संधी शोधत प्रगतीच्या दिशेने वाटचाल करीत आहे.

नारायणगाव (खेरवाडी) लोकजीवनात पारंपरिक ग्रामीण संस्कृतीसोबतच आधुनिकतेची झलकही दिसते, ज्यामुळे गावाचा विकास आणि एकात्मता दोन्ही जोपासले जातात.

लोकसंख्या

वर्ग लोकसंख्या
पुरुष २८१५
स्त्रिया २३३६
एकूण ५१५१

संस्कृती व परंपरा

नारायणगाव (खेरवाडी) गावाचे सांस्कृतिक जीवन समृद्ध आणि विविधतेने नटलेले आहे. येथे वर्षभर विविध धार्मिक, सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात. गावातील प्रमुख देवतांच्या पूजाअर्चा व साप्ताह यामुळे ग्रामस्थांमध्ये एकोपा आणि श्रद्धेची भावना दृढ होते.

गणेशोत्सव, नवरात्र, दिवाळी, होळी यांसारखे सण गावात उत्साहाने साजरे केले जातात. या सणांमुळे गावातील मुलं, तरुण व वयोवृद्ध सर्वच वयोगट एकत्र येऊन आनंदोत्सव साजरा करतात.

गावात लोककला, कीर्तन, यात्रा, भजन आणि पारंपरिक खेळ यांचा विशेष प्रभाव दिसून येतो. पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या परंपरा जपतानाच नवीन पिढी आधुनिकतेशी जुळवून घेते.

स्त्रियांचा सहभाग ग्रामविकासात तसेच सांस्कृतिक उपक्रमांमध्ये मोठ्या प्रमाणावर असतो. स्वयंसहाय्य गटांद्वारे महिला सामाजिक व आर्थिक प्रगतीत योगदान देतात.

यामुळे नारायणगाव (खेरवाडी) गावाचे लोकजीवन परंपरा आणि आधुनिकता यांचा सुंदर संगम साधत आजही एकात्मतेने टिकून आहे.

प्रेक्षणीय स्थळे

  • ग्रामदैवताचे मंदिर – गावातील प्रमुख देवतेचे मंदिर हे गावकऱ्यांचे श्रद्धास्थान असून येथे दरवर्षी साप्ताहासारखे धार्मिक कार्यक्रम यात्रा आयोजित केले जातात.
  • हनुमान मंदिर – गावाच्या मध्यवर्ती भागात असलेले हे मंदिर उत्सव व सणासुदीला ग्रामस्थांच्या भेटीगाठींचे केंद्र असते.
  • शेती क्षेत्र व द्राक्षबागा – नारायणगाव (खेरवाडी) द्राक्ष व ऊस उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. गावातील हिरवीगार शेते, द्राक्षबागा आणि उसाची शेती पाहण्याजोगी आहे.
  • जलसंधारण प्रकल्प – पाणलोट क्षेत्राचा विकास व जलसंधारणाची चांगली सोय यामुळे परिसरात नैसर्गिक सौंदर्य खुलून दिसते.

जवळची गावे

नारायणगाव (खेरवाडी) गाव निफाड तालुक्यातील मध्यवर्ती ठिकाणी असल्यामुळे आजूबाजूला अनेक गावे आहेत. ही गावे नारायणगाव(खेरवाडी) सोबत सामाजिक, शैक्षणिक, व्यावसायिक व सांस्कृतिकदृष्ट्या जोडलेली आहेत. चांदोरी, ओझर, चितेगाव, दात्याणे, ओणे, सुकेणे ही नारायणगाव(खेरवाडी) च्या आसपासची प्रमुख गावे आहेत.

ग्रामपंचायत प्रशासन


अ.क्र. नाव पद मोबाईल क्रमांक
सौ. प्रतिभा अरुण संगमनेरे सरपंच ९७६७६५०८२७
श्री. कैलास निवृत्ती संगमनेरे उपसरपंच ९४०४९८५८९३
सौ. अश्विनी दिपक जाधव सदस्य ९९२३३२४०४१
सौ. योगिता किसन लांडगे सदस्य ९९२३४३८३०७
श्री. विजय रामचंद्र लांडगे सदस्य ९९२२४९३२२०
श्री. उमेश वसंत पगारे सदस्य ९८६०१५०६८५
श्री. सोपान राजाराम संगमनेरे सदस्य ९८५०७३२४९९
श्री. पुष्पा अनिल संगमनेरे सदस्य ९८२३११६४६१
सौ. रक्षा सोमनाथ उगले सदस्य ९६९९२२८६४२
१० सौ. विमल भाऊसाहेब निपुंगळे सदस्य ९७६४४०७१६६
११ श्री. संदीप केदू पवार सदस्य ९३२५९५६८४८
१२ सौ. रूपा विलास पाटील सदस्य ७८७५३७४१५०
१३ श्री. रतन पांडुरंग बांडे सदस्य ७०८३०८३१०७
१४ श्रीमती. सोनाली रामनाथ सांगळे ग्रामपंचायत अधिकारी ८८०६८२७४४५

लोकसंख्या आकडेवारी


१०१०
५१५१
२८१५
२३३६
Logo 1
Logo 2
Logo 3
Logo 4
Logo 5
Logo 6